MHWING

Government Schemes, Government Job, News, Tech, Education and Information

स्वाधार योजना/ स्वाधार शिष्यवृत्ती योजना

 स्वाधार योजना/ स्वाधारशिष्यवृत्ती योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

स्वाधार योजना माहिती मराठी शिष्यवृत्ती योजना




स्वाधार योजना काय आहे

स्वाधार योजना ही समाजातील मागासवर्गीय विद्यार्थी तसेच अनु. जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक सहाय्य्य देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे  आणि त्यांच्या आर्थिक अडचणींना आधार देणे तसेच समाजात शैक्षणिक समानता साधण्याचा प्रयत्न करणे हा आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वी नंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अशा विद्यार्थ्यांना ज्यांना शासकीय वसतिगृह मिळालं नाही, त्यांना या योजनेतून थेट बँक खात्यात आर्थिक साहाय्य दिले जाते.

स्वाधार योजनेची उद्दिष्टे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश केलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला आला नाही अशा विध्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सोयी स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक ज्या बँकेच्या खात्याशी जोडलेली आहे त्या खात्यात सरळ dbt द्वारे रक्कम जमा केली जाते.

योजनेच्या लाभाचे स्वरूप

आर्थिक सहाय्य्यता : अनु. जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना रु. 51000/- दोन हप्त्यांमध्ये वितरित केली जातात.


शैक्षणिक साहित्यासाठी सहाय्य्यता : वैद्यकिय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रु. 5000/- तर इतर अभ्यासक्रमासाठी रु. 2000/- शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दिले जातात.

 



अटी व शर्ती

1. विद्यार्थ्यांची Cast Category : अर्जदार विद्यार्थी अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.

2. रहिवासी/अधिवास : विद्यार्थी हा ग्रामीण भागातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

3. अभ्यासक्रम व गुण : विद्यार्थ्याने इयत्ता 11 वी, 12 वी किंवा त्यानंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असावे. 11 वीमध्ये कमीत कमी 50% गुण आवश्यक.

4. योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने मागील वर्षीचे गुणपत्रक आणि आवश्यक कागद पत्रे अर्ज भरताना सादर करण्यात यावी.

5. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना: अनु. जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जागा ४०%  राखीव असते

6. विध्यार्थी १० वि नंतरचे शिक्षण घेणारा असावा

7. 11 वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 %  गुण असावेत.

 

स्वाधार योजना कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड, Leaving Certificate, Voter ID )
  • जातीचा दाखला
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • उत्पन्नाचा दाखला 2,50,000/- पेक्षा कमी असावे
  • आधार नंबर जोडलेले बँक खाते बँक खाते तपशील

अर्ज प्रक्रिया

अर्ज हा online  पद्धतीने भरायचा आहे आणि तो भारत असताना आवश्यक वर दिलेली कागद पत्रे सोबत ठेऊन काळजी पूर्वक भराव. खालील दिलेल्या लिंक वर  अर्ज भारत

स्वाधार योजना फॉर्म online https://syn.mahasamajkalyan.in/register.aspx

Click For Application    https://mahadbtmahait.gov.in/  अधिकृत website

 Swadhar yojna form/स्वाधार योजना pdf

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सामाजिक न्याय व शैक्षणिक विकास विभागाने राबवण्यात येणारी  योजना आहे तरी सर्व विध्यार्थ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी जवळच्या समाज कल्याण विभागाशी तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य,

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण. संपर्क साधावा. या योजनेद्वारे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक प्रोत्साहन मिळते.

Post a Comment

0 Comments