Solar Roof Top/सोलर रूफ टॉप योजना २०२४
सोलर रूफ टॉप योजना/Solar roof Top Scheme
PM Surya ghar Yojna
❂ सोलर रूफ टॉप विषयी थोडक्यात सांगायचे झाले तर
सौर ऊर्जा हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. वाढत्या विजेच्या खर्चासोबतच पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून, भारत सरकारने नागरिकांसाठी "सौर रूफटॉप योजना" सुरू केली आहे. या योजनेद्वारे नागरिकांना त्यांच्या घरांच्या छतावर सौर पॅनेल्स बसवण्यासाठी आर्थिक मदत आणि सबसिडी दिली जाते. या योजनेमुळे विजेच्या खर्चात मोठी बचत करण्यात मदत होते. तसेच प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे रक्षण देखील शक्य होते. सोलर रूफ टॉप किंमत सुद्धा कमी असते आणि सरकार द्वारे अनुदान दिल्या जाते त्यामुळे सौर ऊर्जा आपल्याला कमी खर्चात उपलब्ध होते. Rooftop Solar Yojana च्या माध्यमातून घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळत आहे, ज्यामुळे ऊर्जा स्वावलंबन साधता येते. सोलर रूफ टॉप योजने अंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनल बसविले जातात आणि त्यादयरे वीज निर्मिती केल्या जाते, यादवारे वीज निर्माण करण्यास खर्च कमी लागतो आणि प्रदूषण पण नाहींच्या बरोबर असते त्यामुळे सरकारमार्फत विविध योजना राबिविल्या जाते, त्यातच एक PM- सूर्यघर योजना सरकार द्वारे राबिविल्या जात आहे आणि सोलर रूफ टॉप बसविण्या साठी अनुदान दिल्या जाते त्यामुळे नागरिकांना आर्थिक मदत होते.
सोलर रूफ टॉप/solar for rooftop
❂ सोलर रूफ टॉप/solar
for rooftop
योजना |
सोलर रूफ टॉप योजना |
योजना स्रोत |
केंद्र/राज्य सरकार |
लाभार्थी |
भारतीय नागरिक |
अनुदान |
सोलर खरेदीसाठी आणि बसविण्यासाठी |
अर्ज प्रक्रिया |
online
|
अधिकृत वेबसाइट |
❂ सोलर रूफ टॉप योजनेचे उद्दिष्ठे
1. राज्यातील नागरिकांच्या घरांवर सौर पॅनेल बसवण्यासाठी आणि सौर पॅनेलच्या खरेदीसाठी अनुदान पुरवणे, हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे.
2. नागरिकांच्या घर, कार्यालय, आणि कारखान्यांच्या छतावर सौर पॅनेल लावून विजेचा खर्च कमी करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
3. राज्यातील नागरिकांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य या योजनेमागे आहे.
4. राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जा वापरण्यास प्रवृत्त करणे, ही या योजनेची मुख्य भूमिका आहे.
5. नागरिकांसाठी स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोत प्रदान करणे, हे या योजनेचे अंतिम उद्दिष्ट आहे.
❂ सोलर रूफ टॉप योजनेचे वैशिष्ट्ये
1. राज्यातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
2. या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात वीज प्राप्त होऊ शकते.
3. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज उरत नाही.
❂ फायदे
1. Solar Rooftop Subsidy योजनेमुळे घरगुती विजेच्या बिलात मोठी बचत होऊ शकते.
2. या योजनेअंतर्गत सोलर पॅनेल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते.
3. राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
4. घर, कारखाना, किंवा कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनेल बसवणे या योजनेमुळे शक्य होते.
5. सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनेल्ससाठी 25 वर्षांची गॅरंटी दिली जाते.
6. सौर ऊर्जा निर्माण केल्यामुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगच्या माध्यमातून महावितरणाला विकून आर्थिक फायदा होतो.
7. या योजनेमुळे नागरिकांना लोडशेडिंगच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.
8. सोलर पॅनेलच्या स्थापनेसाठी होणारा खर्च 4-5 वर्षांत वसूल होतो, त्यानंतर पुढील 20 वर्षे मोफत वीज वापरता येते.
9. या योजनेद्वारे सोलर पॅनेलच्या मदतीने स्वच्छ आणि मोफत वीज निर्माण करता येते.
10. सौर ऊर्जा पर्यावरणपूरक असल्यामुळे तिचा पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.
❂ अनुदान/ subsidy
1. 3 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनेल खरेदीसाठी सरकारकडून 40% अनुदान उपलब्ध करून
दिले जाते.
2. 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर पॅनेलसाठी 20% अनुदानाचा लाभ दिला जातो.
3. सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत उत्पादन क्षमता असलेल्या उपकरणांवरही
20% अनुदान देण्यात येते.
4. गृहनिर्माण सोसायट्या व निवासी कल्याणकारी संघटनांमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी,
प्रति ग्राहक 10 किलोवॅटपर्यंत विद्युत उत्पादनक्षम उपकरणांवर 20% अनुदान दिले जाते.
❂ सोलर रूफ टॉप योजनेअंतर्गत सोलर रूफ टॉप ची किंमत
Solar roof Top Subsidy And Price
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
❂ योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:
1) 3 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनेल खरेदीसाठी राज्य शासनाकडून 40% अनुदान दिले जाते.
2). 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर पॅनेल खरेदीसाठी 20% अनुदानाचा लाभ दिला जातो.
3) सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंतची विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणांवर शासनाकडून 20% अनुदान उपलब्ध आहे.
4) गृहनिर्माण सोसायटी व निवासी कल्याणकारी संघटनांतील ग्राहकांसाठी प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅटपर्यंतच्या सौर उपकरणांवर 20% अनुदान दिले जाते.
❂ योजनेचे नियम व अटी
1. ज्या गावात किंवा दुर्गम भागात विजेची जोडणी झालेली नाही, अशा गावांना या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडून काही रक्कम भरावी लागते, उर्वरित रक्कम महाराष्ट्र शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाते.
3. सोलर रूफटॉप सब्सिडी योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठीच उपलब्ध आहे.
4. महाराष्ट्र राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
5. एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
6. अर्जदार व्यक्तीने ज्या जागेवर सोलर पॅनेल बसवायचे आहे, ती जागा त्याच्या स्वतःच्या मालकीची असावी.
7. अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
8. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
9. जर अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
10. एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ दिला जाईल.
❂आवश्यक कागदपत्रे
►लाभार्थ्यांचे आधार कार्ड
►रेशन कार्ड /राशन कार्ड
►पॅन कार्ड
►ग्रामपंचायत राहवासी दाखला
►जागेचा ८अ
►बँक खाते पासबुक
►पासपोर्ट फोटो
►उत्पनाचा दाखला
►बँक खात्याशी जुळेल मोबाइल नंबर
►इलेकट्रीक बिल
वरील प्रमाणे PM सूर्यघर योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा आणि पर्यावरण प्रदूषण कमी करण्यास थोडेशे सहकार्य करावे. या योजनेसाठी Online अर्ज कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती पुढील लेखामध्ये प्रकाशित केल्या जाईल, अशाच नवनवीन माहितीसाठी वर दिलेल्या सोसिअल लिंक द्वारे Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
0 Comments